Label

मुद्रातील योजना

प्रधानमंत्री मुद्रा योजना (पीएमएमवाय)

  1. शिशु : 50,000 / - पर्यंत कर्ज.

  2. किशोर : 50,000 / - ते 5 लाखांपर्यंत कर्ज

  3. तरुण : 5 लाखावरील आणि 10 लाखांपर्यंतची कर्ज.

  4. सूक्ष्म पत योजना : सूक्ष्म पतपुरवठा योजना सूक्ष्म पतपुरवठा करणाऱ्या संस्थांकडून (एमएफआय) द्वारे प्रामुख्याने विविध सूक्ष्म उद्योगांच्या उपक्रमांकरिता 1 लाख पर्यंतच्या कर्ज मागणीसाठी केली जाते. अर्थात, स्वयंसहाय्यता (SHG) सारख्या गटांद्वारे वैयक्तिक लाभार्थीना विविध लघु उद्योगासाठी वित्तीय साहाय्य कर्ज स्वरूपात देण्याची कार्यपद्धती यामध्ये समाविष्ट आहे. यासाठी सूक्ष्म कर्ज पुरवठा करणाऱ्या वित्तीय संस्थांना (एमएफआय) वेळोवेळी मुद्राकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.

  5. बँकांसाठी पुनर्वित्त योजना : विविध व्यावसायिक बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि अनुसूचित सहकारी बँका लघु उदयॊग व्यवसायासाठी कर्ज पूर्वहंता करणेकामी मुद्रा कार्यालयाकडून पुनर्वित्त उपलब्ध करून घेण्यास पात्र आहेत. पुनर्वित्त हे 10 लाख प्रति युनिट पर्यंतच्या मुदत कर्जासाठी आणि खेळते भांडवल कर्जासाठी उपलब्ध आहे. मुद्रा कार्यालयाने निश्चित केलेल्या धोरणानुसार ज्या बँकांनी मुद्रा कार्यालयाकडे पुनर्वित्त सुविधेसाठी नोंदणी केली आहे अशा बँका त्यांनी शिशु, किशोर व तरुण गटांतर्गत केलेल्या कर्ज रकमेसाठी पुनर्वित्त मुद्रा कडून उपलब्ध करून घेण्याची सुविधा आहे.

  6. महिलांचे उद्योगासाठी वित्तपुरवठा कार्यक्रम: महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी वित्तपुरवठा करणाऱ्या बँका / एमएफआय महिला उद्योजकांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करणे अशा व इतर प्रकारच्या अतिरिक्त सुविधा पुरविण्याबाबत विचार करू शकतात. सध्या महिला उद्योजकांना कर्ज देत असलेल्या बँकांना व्याजदरात 25 बीपीएसची कपात मुद्राने केली आहे.

  7. मुद्रा कार्ड : रोख पत (Cash Credit) स्वरुपात उद्योगासाठी खेळत्या भांडवलाची सुविधा पुरविणारे मुद्रा कार्ड हे एक नाविन्यपूर्ण उत्पादन आहे. मुद्रा कर्जांतर्गत खेळत्या भांडवलासाठी दिलेले डेबिट कार्ड आहे. कर्जदारास मुद्रा कार्डचा वापर हा गरजेनुरुप एकापेक्षा अधिक वेळा कर्ज रक्कम काढण्यासाठी करता येते. जेणेकरुन कर्ज रकमेचा उपयोग कार्यक्षम पध्दतीने व्यवस्थापित करुन व्याजाचा बोजा नियंत्रित करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. मुद्रा कार्ड वापरामुळे मुद्रा कर्ज व्यवहाराचे डिजिटायझेशन होण्यास व कर्ज पूर्वइतिहास जाणून घेण्यासाठी उपयुक्त आहे.