Label

मुद्राची उत्पत्ती,भूमिका आणि जबाबदाऱ्या

मुद्रा-उत्पत्ती

अर्थमंत्री मा. श्री अरुण जेटली यांनी सन 2015-16 साठी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये मुद्रा बँकेच्या स्थापनेची घोषणा केली. त्यानुसार मार्च 2015 मध्ये कंपनी कायदा 2013 अंतर्गत आणि भारतीय रिजर्व बँकेशी नॉन-बँकिंग फायनान्स इन्स्टिटय़ूशन म्हणून मार्च, 2015 मध्ये कंपनीच्या स्वरूपात मुद्राला नोंदणीकृत करण्यात आले. मा. प्रधान मंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी दिनांक 08 एप्रिल, 2015 रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमामध्ये प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेची घोषणा केली.

मुद्राची भूमिका आणि जबाबदाऱ्या

देशातील लघु उद्योग क्षेत्राला पुनर्वित्तच्या माध्यमातून वित्तीय सहाय्य उपलब्ध करून विकास साधण्याच्या मूळ उद्देशाने मुद्राची स्थापना करण्यात आली आहे. मुद्राच्या माध्यमातून लघु उद्योग क्षेत्रातील जे घटक वित्तीय सहाय्यापासून वंचित आहेत त्यांना वित्तीय सहाय्य उपलब्ध करण्याचे ध्येय ठेऊन भारत सरकारच्या दिनांक ०२ मार्च, २०१५च्या प्रकाशनाद्वारे मुद्राची भूमिका आणि जबाबदाऱ्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.