अर्थमंत्री मा. श्री अरुण जेटली यांनी सन 2015-16 साठी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये मुद्रा बँकेच्या स्थापनेची घोषणा केली. त्यानुसार मार्च 2015 मध्ये कंपनी कायदा 2013 अंतर्गत आणि भारतीय रिजर्व बँकेशी नॉन-बँकिंग फायनान्स इन्स्टिटय़ूशन म्हणून मार्च, 2015 मध्ये कंपनीच्या स्वरूपात मुद्राला नोंदणीकृत करण्यात आले. मा. प्रधान मंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी दिनांक 08 एप्रिल, 2015 रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमामध्ये प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेची घोषणा केली.